२१ वर्षांची केतकी जेव्हा क्लिनिकमधे आली तेव्हा ती रडुन रडुन आपल्या केसांच्या समस्या सांगु लागली, तीचा आत्मविश्वास सुद्धा यामुळे डळमळीत झाला होता. अयोग्य आहार, केसांची निगा न घेणे, जंक फुड/फास्ट फुड चा अतिरेक, तणाव, अपुरी झोप या सर्व कारणांनी तीचे केस अति प्रमाणात गळत होते व उरलेले केस देखिल रुक्ष, निस्तेज दिसत होते. संपुर्ण हिस्टरी व केस समजुन घेतल्या नंतर मी तीला आश्वस्त केलं. शिरोधारा सारखे काहिपंचकर्म व आयुर्वेदिक औषधींचा वापर करुन ३ महिन्यात तीचे केस गळणे थांबलेच, केस बळकट व चमकदार दिसु लागले. हसत हसत थँक्यु म्हणत ती क्लिनिक मधुन गेली व पुढच्या आठवड्यात तीच्या मैत्रीनीला ट्रीटमेंट साठी घेउन आली.
खरंच केस हे स्त्रीयांसाठी राणीच्या मुकुटाप्रमाणे असतात व ते स्त्रीयांच्या स्त्रीत्वाचे, सौन्दर्याचे व आत्मसन्मानाचे प्रतिक आहे असे मानले जाते. केस हे स्त्री व पुरुष दोन्हींमध्ये सौंदर्य व व्यक्तिमत्व वृद्धींगत करतात. म्हणुनच जेव्हा केसांचे आरोग्य बिघडुन ते गळु लागतात किंवा टक्कल पडते तेव्हा ते सौंदर्य, आत्मसन्मान व आत्मविश्वास यांना हानिकारक असतात. अकाली केस गळणे हे हल्ली सर्वच व्यक्तिंमध्ये कमी अधिक प्रमाणात दिसुन येते. पुर्वी वयाच्या पन्नाशीनंतर अढळणार्या केसांच्या समस्या आजकाल ऎन २०- २१ वर्षाच्या तरुण / तरुणींमधे अढळुन येतात.
केसांच्या समस्यांचे व ते निरोगी ठेवन्याचे उपाय यांचे आयुर्वेदात सविस्तर वर्णन अढळते. आयुर्वेदात केस गळन्यास - खालित्य असे म्हटले जाते व याचे वर्णन शिरोरोगांमधे केले आहे. विकृत पित्त हे वातासोबत प्रकुपित होऊन केसांच्या मुळांना कमजोर करते व..... अधिक भेट वाचण्यासाठी: https://www.ayurvedanashik.com/post/ayurvedic-treatment-hair-fall-nashik
No comments:
Post a Comment